============================
चढाईसाठीची कौशल्ये :-
पायाचा पंजा मारणे, लाथ मारणे, हात मारणे, उडी मारणे बचावात्मक कौशल्ये :- मनगट पकडणे, मांडी पकड, घोटा पकड, कंबर पकड, साखळीत पकड
🧿 नाणेफेक जिंकणाऱ्या संघास अंगण अथवा चढाई यापैकी एकाची निवड करण्याचा अधिकार राहिल आणि नाणेफेक हरणाऱ्यास अंगण अगर चढाई यातून राहिलेल्या एकाची निवड करता येईल. दुसऱ्या डावात अंगणाची अदला बदल करावी आणि ज्या संघाने आपला खेळाडू प्रथम चढाईस पाठविला नसेल त्या संघाने आपला खेळाडू प्रथम चढाईस पाठवावा. पहिला डाव संपण्याच्या वेळी जितके खेळाडू खेळत असतील तितक्याच खेळाडूंना दुसरा डाव सुरू करावा.
🧿 खेळ चालू असताना खेळाडूच्या शरिराच्या कोणत्याही भागाचा अंतिम मर्यादेबाहेर जमिनीस स्पर्श झाल्यास तो खेळाडू बाद झाला असे समजावे पण झटापटीच्या वेळी मात्र खेळाडूच्या शरीराचा कोणताही भाग क्रीडांगणाच्या मर्यादिच्या आत जमिनीस लागलेला असेल तोपर्यंत तो बाद झाला असे होत नाही.
🧿 अ) खेळ चालू असताना खेळाडू अंतिम मर्यादेबाहेर गेला तर तो बाद झाला असे समजावे अशा खेळाडूस समान अधिकाऱ्यांनी त्वरीत क्रीडांगणाबाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. पंच अथवा सरपंच यांनी त्या खेळाडूचा क्रमांक सांगून बाद म्हणून मोठ्याने जाहीर करावे. चढाई चालू असेपर्यंत शिट्टी वाजवू नये.
ब) बचाव करणारा जर क्रमांक तीन अ च्या नियमान्वये क्रीडांगणाबाहेर गेला असेल व त्याने चढाई करणाऱ्यास पकडले तर चढाई करणारा नाबाद जाहीर करावा. बचाव करणारा अथवा करणारे अंतिम मर्यादेबाहेर गेले असतील तेच बाद झाल्याचे जाहीर करावे. बचाव करणारा अगर करणारे क्रीडांगणाबाहेर गेल्याने बाद होऊनही परत पकडीत सहभागी झाल्यास त्याच्या कृत्याबाबत विरोधी संघास एक तांत्रिक गुण द्यावा.
🧿झटापट सुरू झाली की राखीव क्षेत्राचा क्रीडा क्षेत्रामध्ये समावेश होतो. झटापट संपल्यानंतर झटापटीत समाविष्ट असलेल्या खेळाडूंनी आपपल्या अंगणात प्रवेश करीत असताना राखीव क्षेत्राचा उपयोग केला तरी चालेल. (हा नियम फक्त बचाव करणाऱ्याच्या अंगणातील क्रियेस ग्राह्य धरला जाईल.
🧿 चढाई करणान्याने दम घालण्याच्या वेळी "कबड्डी" हा शब्दोचार स्पष्ट केला पाहिजे. जर तो "कबड्डी" असा सुस्पष्ट दम घेत नसेल तर पंचाने त्यास परत पाठवावे आणि विरुद्ध संघास एक तांत्रिक गुण देऊन पुन्हा त्यांनाच चढाईची संधी द्यावी..
🧿चढाई करणाऱ्याने प्रतिपक्षाचे अंगणास स्पर्श करण्यापूर्वी दम घालण्यास प्रारंभ केला पाहिजे. जर त्याने उशिरा दम घालण्यास प्रारंभ केला तर पंच किंवा सरपंचाने विरुद्ध संघास तांत्रिक गुण जाहीर करून त्यास पुन्हा चढाईची संधी द्यावी.
🧿आपली पाळी नसताना जर एखादा खेळाडू प्रतिपक्षाच्या अंगणात चढाईस गेला तर पंचांनी अथवा सरपंचांनी त्यास परत पाठवावे व विरुद्ध संघास एक तांत्रिक गुण द्यावा.
🧿 एका वेळेस फक्त एकच खेळाडूने प्रतिपक्षाचे अंगणात चढाईस जावे. एका वेळी जर एकाहून अधिक खेळाडू प्रतिपक्षाच्या अंगणात चढाईस गेले तर पंच अथवा सरपंचाने त्यांना परत बोलवावे व विरुद्ध संघास एक तांत्रिक गुण जाहीर करून पुन्हा त्यांनाच चढाईची संधी द्यावी.
🧿चढाई करणारा परत आपल्या अंगणात आल्यावर किंवा प्रतिपक्षाच्या अंगणात बाद झाल्यास लागलीच दुसऱ्या संघाने आपला एक खेळाडू विरुद्ध संघाच्या अंगणात पाच (५) सेकंदाच्या आत चढाईस पाठवावा. अशा तन्हेने आळीपाळीने चढाई करण्यास खेळाडू पाठविण्याचा क्रम खेळ संपेपर्यंत चालू ठेवावा मात्र चढाई करणाऱ्याने चढाई करण्यासाठी पाच सेकंदापेक्षा जास्त वेळ घेतल्यास त्यांची चढाईची पाळी संपली असे जाहीर करून विरुद्ध संघास एक तांत्रिक गुण द्यावा व पुन्हा त्यांनाच चढाई करण्यास सांगावे.
🧿 चढाई करणाऱ्यास बचाव करणाऱ्यांनी पकडले असता चढाई करणारा जर त्यांच्या पकडीच्या प्रयत्नातून सुटून सुरक्षित आपल्या अंगणात आल्यास त्याचा पाठलाग करता येणार नाही. परंतु चढाई करणारा बचाव करणाऱ्यास किंवा करणाऱ्यांना केवळ स्पर्श करून आपल्या अंगणात सुरक्षित जात असेल. अशा वेळी त्याचा पाठलाग करता येईल.
🧿 चढाई करत असताना प्रतिपक्षाच्या अंगणात जर चढाई करणाऱ्याचा दम गेला तर तो बाद झाला असे समजावे.
🧿 चढाई करताना पकडला गेल्यावर बचाव करणाऱ्याने बुद्धीपुरस्पर त्याच्या तोंडावर हात ठेऊन त्याच्या दमात अडथळा करू नये. तसेच कोणत्याही स्वरूपाची कैची अथवा दुखापत होईल असे आरोग्यास अपायकारक उपाय योजून पकड करू नये. तसे घडल्यास दुष्टोपत्तीस आल्यास, चढाई करणारा बाद नसल्याचे पंचांनी अथवा सरपंचाने जाहीर करावे. (सामान्याचे अधिकार नियम क्र. ३ आणि ४ दंड योजनेसाठी अभ्यासावा.)
🧿बचाव करणाऱ्याने स्वतःच्या शरीराच्या कोणत्याही भागाने चढाई करणाऱ्यास बुद्धीपुरस्पर बचाव करणाऱ्यास अंतिम मर्यादेबाहेर ढकलू अगर ओढू नये. जर चढाई करणारा अंतिम मर्यादेबाहेर ढकलला अगर ओढला गेला असेल तर पंचाने अथवा सरपंचाने अशा अंतिम मर्यादेबाहेर ढकलणाऱ्या अथवा ओढणाऱ्या खेळाडूस बाद म्हणून जाहीर करावे.
🧿 चढाई करणारा खेळाडू जोपर्यंत आपल्या अंगणात परत येत नाही तोपर्यंत बचाव करणाऱ्या खेळाडूंपैकी कोणीही शरीराच्या कोणत्याही भागाने चढाई करणाऱ्या खेळाडूच्या अंगणास मध्य रेषेपलीकडे स्पर्श करता कामा नये. तसे केल्यास ते बाद होतील व प्रतिपक्षास तितके गुण मिळतील.
🧿नियम क्रमांक १४ प्रमाणे बाद झालेल्या बचाव करणाऱ्या खेळाडूने जर चढाई करणाऱ्यास पकडले किंवा पकडण्यास मदत केली असेल तर संघास एक तांत्रिक गुण द्यावा. व चढाई करणारा आपल्या अंगणात सुरक्षितपणे आला असे समजावे आणि ज्या बचाव करणाऱ्या खेळाडू अथवा खेळाडूंचा प्रतिपक्षाचे अंगणास स्पर्श केला असेल त्यासच वाद म्हणून जाहीर करावे.
🧿 एखाद्या संघाने प्रतिपक्षाचे सर्व गडी बाद केले अथवा प्रतिपक्षाचे सर्व गडी बाद झाले व विरुद्ध पक्षाचा गडी कुणीच पुन्हा जिवंत होऊ शकत नसेल, तर त्या संघाने लोण केला असे समजावे व बाद केलेल्या खेळाडूच्या गुणाव्यतिरिक्त लोणाचे दोन जादा गुण जाहीर करावेत. यानंतर दोन्ही संघातील खेळाडू आपापल्या अंगणात १० सेकंदात प्रवेश करतील. अन्यथा पंच अथवा सरपंच प्रतिपक्षास तांत्रिक गुण जाहीर करतील. त्यानंतरही एखादा संघ आपल्या अंगणात प्रवेश करीत नसेल तर सरपंच अशा संपास आपल्या अंगणात येण्याची सुचना करील. या उपरही तो संघ एक मिनीटाच्या आत आपल्या अंगणात आला नाही तर तो संघ त्या सामन्यापुरता बाद करून विरुद्ध संघ जिंकल्याचे जाहीर करावे. १७) चढाई करणारा प्रतिपक्षाच्या अंगणात चढाई करीत असताना त्याला त्याच्या संघातील एखाद्या खेळाडूने अन्य प्रकारे सुचित केल्यास पंचाने अथवा सरपंचाने विरुद्ध संघास एक तांत्रिक गुण द्यावा.
🧿चढाई करणाऱ्या किंवा बचाव करणाऱ्या खेळाडूस अवयव अथवा घड याशिवाय शरीराचे इतर कोणत्याही भागाने बुद्धीपुरस्पर पकडू नये. जो या नियमांचा भंग करील तो खेळाडू बाद झाल्याचे जाहीर करावे. जर चढाई करणाऱ्या खेळाडूस बुद्धीपुरस्पर अवयव व धड याशिवाय शरीराच्या इतर भागाने पकडले असेल तर पंचाने अथवा सरपंचाने चढाई करणारा खेळाडू बाद नसल्याचे जाहीर करावे.
(टिप: एखाद्या चढाई करणाऱ्यास जाणुनबुजून त्याचे कपडे अथवा केस धरून पकड केल्यास त्या खेळाडूस नावाद म्हणून जाहीर करावे आणि नियम क्र. १८ चा भंग करणाऱ्या बचाव पक्षाच्या खेळाडूस बाद म्हणून जाहीर करावे.)
🧿प्रतिपक्षाच्या एक किंवा अनेक खेळाडू बाद झाले म्हणजे दरवेळी बाद करणाऱ्या संघाचा खेळाडू बाद झालेल्या क्रमांकाने जिवंत होतो.
संपास पकडीच्या गुणाबरोबर एकै जादा म्हणजे एकूण दोन गुण द्यावेत. गुणपत्रिकेत या गुणांची नोंद करताना प्रथम पकडीचा गुण व नंतर अधिकचा गुण अशा प्रकारे नोंद करावा.
(ब) अंगणात तीन किंवा ज्यापेक्षा कमी खेळाडू (बचावपटू) असताना चढाईपटू स्वयंचित झाला व उर्वरित तीन खेळाडूंनी चढाईपटूची पकड केली तर ती अव्वल पकड समजावी.
ड) जेव्हा एक किंवा त्यापेक्षा जादा खेळाडू निलंबित असतील तर जेवढे खेळाडू निलंबित असतील ते खेळाडू अंगणात गृहीत धरून अव्वल पकड़ हा नियम अंमलात आणावा.
🧿निर्णायक चढाई:-
ई) अव्वल पकड हा नियम चढाईपटू व बचावपटू दोघेही बाद ग्राह्य मानला जाईल,
अ) चढाईमध्ये गुण मिळविणे अगर गुण गमावणे या क्रिया घडविणारी प्रत्येक चढाई 'निर्णायक चढाई' समजली जाईल. पहिल्या दोन सलग चढ़ाया अनुत्पादित झाल्यास तिसरी चढाई ही निर्णायक असावयास हवी. या चढाईत गुण न नोंदविल्यास ती चढाई अनुत्पादित समजून चढाईचा खेळाडू बाद दिला जाईल व विरुद्ध संपास एक गुण दिला जाईल. प्रत्येक डावाच्या सुरुवातीस चढाई ही त्या-त्या संपाची पहिली चढाई समजावी,
(ब) खेळाडू, प्रशिक्षक किंवा व्यवस्थापक यांना पिवळे किंवा लाल कार्ड दाखवून विरूद्ध संपास तांत्रिक गुण जाहिर केल्यास हा गुण निर्णायक चढाईसाठी ग्राह्य धरता येणार नाही.
🧿 अंतिम निकाल :
संपूर्ण खेळ संपल्यानंतर ज्या संघाची गुणसंख्या अधिक असेल तो संघ विजयी झाल्याचे जाहीर करावे.
🧿 बाद पद्धतीत गुण झाल्यास :
१) दोन्ही संघात क्षेत्ररक्षणाकरिता सात खेळाडू अंगणात असतील आणि दोन्ही संघांना प्रत्येकी पाच चढायांची संधी आळी पाळीने दिली जाईल.
२) अशावेळी निदान रेषेवर क्षेत्ररक्षण करून खेळ खेळविला जाईल.
(३) यावेळी निदान रेषा ही बोनस रेषेच्या नियमाप्रमाणे गृहीत धरली जाईल आणि बोनस रेषेचे सर्व नियम अंमलात येतील.
४) चढाई करणाऱ्याने बोनस रेषा सम निदान रेषा ओलांडल्यास एक गुण दिला जाईल,
५) चढाई करणारा जर बोनस रेषा सम निदान रेषा ओलांडून बचाव पक्षातील एक किंवा अनेक खेळाडूंना स्पर्श करून आपल्या अंगणात सुरक्षित आला तर त्यास एक बोनस गुण द्यावा व त्याने बाद केलेल्या खेळाडूंचे गुणही द्यावेत.
६) अशावेळी खेळाडू बाद किंवा जीवंत होणे ही प्रक्रिया अंमलात न आणता फक्त गुण मिळाल्याचे गृहीत धरले जाईल.
७) पाच-पाच चढाई सुरू करण्यापूर्वी दोन्ही संघाच्या संघनायकाने पाच चढाई करणाऱ्या खेळाडूंचा क्रमांक व नाव क्रमवारी चढाई करण्यासाठी देणे आवश्यक आहे. अशा वेळी क्षेत्ररक्षण करताना सात खेळाडूंपैकी खेळाडू बदलता येणार नाही.
८) सरपंच, दिलेल्या क्रमवारीनुसार आळीपाळीने चढाई करण्यास सांगेल.
९) चढाईसाठी दिलेल्या यादीतील पाच खेळाडूंपैकी जर एखाद्या खेळाडूस त्याची चढाईची पाळी येण्यापूर्वी दुखापत झाल्यास उर्वरीत दोन खेळाडूंपैकी एकास चढाईची पाळी देता येईल.
१०) ज्या संघाने खेळ सुरू करताना प्रथम चढाई केली असेल त्याच संघास या वेळी पहिली चढाई दिली जाईल. ११) यानंतर ही समान गुण झाल्यास सुवर्ण चढाई या नियमाचा आधार घेतला जाईल.
टीप :- या पद्धतीच्या खेळामध्ये एक किंवा अनेक खेळाडू बडतर्फ किंवा निलंबित ठरल्यास तितके खेळाडू संख्येने कमी धरून खेळ खेळविला जाईल. बोनस गुण मिळण्याच्या क्रियेत अशा खेळाडूंची संख्या गृहीत धरली जाईल.
सुवर्णचढाई : :-
पाच-पाच चढाई नंतरही जर सामना समान गुणावर असेल तर चढाई करिता नव्याने नाणेफेक केली जाईल. जो संघ नाणेफेक जिंकेल त्या संघास चढाई करण्याची संधी दिली जाईल. सुवर्ण चढाई नंतरही सामना समान गुणांवर असेल तर प्रतिपक्षास (संघास) सुवर्ण चढाई करण्याची संधी दिली जाईल. सुवर्ण चढाईत जी संघ निर्णायक गुण मिळविल तो संघ विजयी ठरविला जाईल. याउपरही सामना समान गुणावर संपला तर नाणेफेक ने करून सामना निर्णायक करावा.
0 Comments