रिले स्पर्धा (४ × १००)
*******************
१) स्पर्धेचे टप्पे व संघातील प्रत्येक खेळाडूची प्रारंभ रेषा धावमार्गाच्या आडव्या आखाव्यात.
२) प्रत्येक स्पर्धकाच्या प्रारंभ रेषेपूर्वी १० मी. व नंतर १० मी. असे २० मी. अंतर 'बदली क्षेत्र) म्हणून असते. या क्षेत्रात पुढील व मागील रेखा रुंदीसहीत यात समाविष्ट आहेत.
३) ४ x १०० रिले स्पर्धेसाठी धावमार्गाचे ४ भाग केलेले असतात. पहिल्या धावपट्टीतील स्पर्धक सोडून इतरांना एक अतिरिक्त अंतर प्रारंभ दिलेला असतो. प्रत्येकाला बदली क्षेत्राच्या अलीकडून १० मी. धाव सुरू करता येते.
४) ४ x १०० स्पर्धा आपल्या नेमून दिलेल्या धावपट्टीतूनच खेळाडूने व त्या संघाने पूर्ण करावयाची असते. स्पर्धेच्या धावपट्ट्या चिठ्ठ्या टाकून निवडल्या जातात.
५) स्पर्धकाला धावपट्टीवर स्मरणचिन्ह रेखाटताना पायाने घासून रेखाटण्यास व जिथे संघटन समितीने स्मरणचिन्हे उपलब्ध करून दिली आहेत तिच चिन्हे वापरता येतील. स्वत:च्या वस्तू वापरता येणार नाहीत.
६) लाकडाचे वा धातूने गडद रंगात रंगविलेले गुटगुटीत जोड नसलेले बॅटन असावे. त्याची लांबी कमीत कमी २८ से. मी. व जास्तीत जास्त ३० से.मी. इतकी असावी. परिघ १२ ते १३ से.मी. व वजन ५० ग्रॅम असावे.
स्पर्धा पूर्ण होईपर्यंत स्पर्धकाचे बॅटन हातात सांभाळले पाहिजे. चुकून पडल्यास ज्याने ते पाडले त्यानेच ते उचलले पाहिजे. त्यावेळी अनावधानाने बॅटन घेण्यासाठी दुसऱ्या पट्टीत गेले तरी चालते.
0 Comments