१. गणिताचा जादुई बॉक्स
🧿 साहित्य क्रमांक १ मध्ये वेगवेगळ्या गणिती घटकांवर आधारित एकूण ३८ ठोकळे आहेत.
🧿विविध गणिती घटकाचे खेळाद्वारे दृढीकरण करण्यासाठी हे साहित्य उपयुक्त आहे. गणिती घटकानुसार एक दोन किंवा अधिक ठोकळे निवडून विद्यार्थी खेळ खेळतील.
उदाहरणार्थ विद्यार्थी दिलेल्या ठोकळ्यांमधील दोन ठोकळे निवडून एकक दशक ओळखणे, संख्या तयार करणे इत्यादी खेळ खेळतील.
🧿 दिलेले साहित्य वापरून विद्यार्थी बैठे खेळ व मैदानी खेळ असे दोन्ही प्रकारचे खेळ खेळू शकतील
🧿बैठे खेळाचे नियम🧿
1. एकावेळी दोन ते चार विद्यार्थी खेळ खेळतील.
२. प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव क्रमाने एका पाटीवर अथवा वहीवर लिहितील.
३. अचूक उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्याच्या नावासमोर बरोबरचे चिन्ह आणि चुकीचे उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्याच्या नावासमोर चुकीचे चिन्ह याप्रमाणे गुण देतील.
उदाहरणार्थ, कालमापन घटकावर आधारित बैठे खेळ खेळण्यासाठी विद्यार्थी संबंधित दोन ठोकळ्यांची निवड करतील.
एक विद्यार्थी एकावेळी दोन्ही ठोकळे टाकेल. समजा एका ठोकळ्यावर आले पाव आणि दुसऱ्यावर आले वर्ष तर
विद्यार्थ्याने पाव वर्ष म्हणजे ३ महिने असे बरोबर उत्तर देणे अपेक्षित असेल.
🧿मैदानी खेळाचे नियम🧿
१. विद्यार्थी ठिकरीच्या खेळाप्रमाणे मैदानावर रिंगण आखतील.
२. आखलेले रिंगण अपूर्णाक ठोकळ्यावर दाखविल्याप्रमाणे पूर्ण अर्धा पाव, पाऊण याप्रमाणे रंगवतील.
३. खेळाचे नियम ठिकरीच्या खेळाप्रमाणेच असतील मात्र विद्यार्थ्यांनी ठोकळा टाकला असता अचूक उत्तर दिले तरच त्यास खेळावयास मिळेल. उत्तर चुकले तर डाव बाद होईल..
उदाहरणार्थ, विद्यार्थी मापन किंवा कालमापन या घटकांपैकी एक ठोकळा निवडतील. समजा विद्यार्थ्यांनी मापन घटकावर आधारित ठोकळा निवडला. एका विद्यार्थ्याने रिंगणात ठोकळा टाकायचा आहे व अचूक उत्तर द्यायचे आहे. उत्तर चुकले तर डाव बाद होईल. समजा विद्यार्थ्याने पाऊण या रिंगणात ठोकळा टाकला व ठोकळ्यावर डझन आले तर विद्यार्थ्याने पाऊण डझन म्हणजेच ९ वस्तू हे अचूक उत्तर देणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्याने अचूक उत्तर दिले तरच त्यास खेळावयास मिळेल. उत्तर चुकले तर डाव बाद होईल.
🧿गणितातील बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, संख्यांचा लहान-मोठेपणा, चढता उतरता क्रम संख्याज्ञान, कालमापन, अपूर्णांक मापन, रोमन संख्याचिन्हे इत्यादी अनेक घटकांचा खेळ पद्धतीने सराव करण्यासाठी विद्यार्थी या साहित्याचा वापर करतील.
0 Comments