लाकूडतोड्या

--------------------------------

   एका छोट्या गावामध्ये एक लाकूडतोड्या राहत होता. लाकूड तोडून आपला तो आपला घरसंसार चालवत होता. एके दिवशी तो झाड शोधत एका नदीकाठी गेला. त्याला एक मोठे झाड सापडले. तो त्या झाडावर फांदी तोडण्यासाठी चढला आणि फांदी तोडू लागला.अचानक त्याच्या हातातून कुऱ्हाड खाली नदीत पडली.त्याच्याजवळ दुसरी कुराड घेणे इतपत ही पैसे नव्हते तो खूप निरास झाला आणि नदीकाठी येऊन रडू लागला .त्याचे रडणे ऐकूनदेवी प्रकट झाली आणि त्याला विचारू लागली की का रे तू रडत आहेस ?  लाकूडतोड्या देवीला आपली कुऱ्हाड नदीत पडली असे सांगतो.

               देवी लगेच नदीत बुडी घेऊन हातात सोन्याची कुऱ्हाड घेऊन प्रकट होते आणि लाकूडतोड्याला विचारते ही आहे का तुझी कुऱ्हाड ? लाकूडतोड्या नम्रपणे म्हणतो देवी ही माझी कुऱ्हाड नाही मग देवी त्याला चांदीची  कुऱ्हाड दाखवते . तो परत मान हलवून ही देखील नाही कुऱ्हाड माझी . असे देवीला सांगतो.

                 आता देवी पुन्हा बुडी घेऊन नदीत जाते व लोखंडाची कुऱ्हाड घेऊन प्रकट होते इतक्यात लाकूडतोड्या म्हणतो होय हीच माझी कुऱ्हाड आहे देवी.

देवी म्हणते तू खूप प्रामाणिक आहे या प्रामाणिकपणामुळे या तीनही कुऱ्हाडी तुलाच बक्षीस स्वरूपात ठेव. तुझा प्रामाणिकपणा खूप चांगला आहे.

तात्पर्य:- नेहमी खरे बोलावे.