-------------------------------------
नाम
प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना जी नावे दिलेली असतात त्यांना व्याकरणात नाम म्हणतात.
व्यक्ती, वस्तू, गुण यांच्या नावांना नाम असे म्हणतात.
--------------------------------------------------
नामाचे मुख्य प्रकार तीन आहेत.
१. सामान्यनाम -
एकाच जातीच्या पदार्थांतील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले त्याला सामान्यनाम असे म्हणतात.
उदा. - नदी, मुलगा, फळ, शहर, पर्वत इत्यादी.
२. विशेषनाम -
ज्या नामाने एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेषनाम असे म्हणतात.
उदा. गंगा, राज , भारत, गुलाब इ.
३. भाववाचक नाम -
जी नामे आपण पाहू शकत नाही परंतु त्यांची माहिती मिळते त्या नामांना भाववाचक नाम असे म्हणतात.
उदा. श्रीमंती, आंबटपणा, सुख इत्यादी.
0 Comments